सिंधुसाद मध्ये आपले स्वागत................
सिंधुदुर्ग .....
सह्याद्रीच्या वेध घेणाऱ्या घाटांचा,
गर्द हिरव्या झाडीतल्या नागमोडी वळणांचा,
नद्यांचा, खाडयांचा, समुद्राच्या लाटांचा,
कर्ली सुरमई बांगड्याचा,
कोंबडी वडे आणि सोलकढीचा,
गगनाला भिडणाऱ्या माडा-पोफळींचा,
आंबा फणस काजूंचा,
सह्याद्रीतील जंगलांचा, तिथल्या प्राणी पक्षांचा,
काळ्या कातळाचा आणि त्यावर बहरणाऱ्या रानफुलांचा,
गड किल्ल्यांचा, प्राचीन मंदिरांचा,
ठाकर आणि दशावतारी कलाकारांचा,
परशुरामभूमितला एक कोहिनूर...सिंधुदुर्ग जिल्हा !!!
सिंधुदुर्गचे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि कलात्मक सौंदर्य सर्व जगासमोर यावे आणि जास्तीत जास्त लोकांनी ते अनुभवावे म्हणून "येवा कोकण आपलोच आसा" अस सांगणारा, रसाळ फणसाची गोडी आणि शहाळ्याची तृप्तता जपणारा कोकणी माणूस, तुम्हाला पुन्हा एकदा साद घालतोय. 'सिंधुसाद...साद सिंधुदुर्गची' च्या निमित्ताने !!! सिंधुदुर्ग मध्ये राहणाऱ्या आणि त्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या मंडळींच्या हाकेला तुम्ही प्रतिसाद दयाल अशी आशा आहे.
मग निघायचं ना एक अविस्मरणीय सिंधुदुर्ग सफर अनुभवण्यासाठी "सिंधुसाद" सोबत…
No comments:
Post a Comment
Give Us Your Comments and Feedback here.
The comments will be displayed after verification.
Regards,
Sindhusaad Team